ही चाचणी परीक्षा रस्त्यावरील चिन्हे ओळखण्याबाबत तुमच्यातील कौशल्याचे परिक्षण करते. सुरक्षितपणे वाहन चालवण्यासाठी रस्त्यावरील चिन्हांची योग्य ओळख करणे अतिशय महत्त्वाचे आहे. वाहन चालक परवाना प्राप्त करण्यासाठी हे एक अनिवार्य कौशल्य समजले जाते.
ही परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर वाहनचालकाला आरटीओ कार्यालयाकडून मिळणाऱ्या वाहन चालवण्याच्या परवान्याबाबत घेतली जाणारी अंतिम लेखी परीक्षा उत्तीर्ण होण्याची शक्यता वाढत असते.