अपघात परिस्थितीत काय करावे?

विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें

वाहन चालवणे हे एक जोखिमपूर्ण काम आहे आणि वाहन चालकाला सावधानपूर्वक आणि एकाग्रता ठेवून वाहन चालवणे आवश्यक असते. दुर्दैवाने अपघात कधीही आणि तुमच्या चुकीशिवायही घडून येऊ शकतो. अचानक होणारा अपघात तुम्हाला भयभीत तसेच दिशाहीन करू शकतो.

जर तुम्ही एखाद्या अपघातात सापडला तर सर्वांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तसेच नियमांचे पालन करण्यासाठी खालील सात सूचनांचे पालन करा. असे केल्यास नंतर विमा कंपनीकडे नुकसानाचा दावा करण्यासाठीही फायदा होऊ शकेल.


१. जखमी लोकांची तपासणी करा

गोल्डन अवरमध्ये (अपघातानंतर एका तासाचा वेळ) वैद्यकीय सुविधांचा अभाव असेल तर अनेक लोकांचा मृत्यू ओढवू शकतो. अपघातानंतर वेळेत मिळालेले वैद्यकीय उपचार अनमोल जीवनाचे संरक्षण करू शकता. अपघातानंतर तुम्हाला तसेच वाहनातील इतर प्रवाशांना झालेल्या दुखापतीची तपासणी करा. एखादी व्यक्ती जखमी असेल तर आपात्कालीन सेवांना मदतीसाठी दूरध्वनीवरून संपर्क साधा. जर आवश्यकता असेल तर आसपासच्या लोकांना फोन करण्यासाठी किंवा मदतीसाठी विनंती करा.

२. सुरक्षित ठिकाणी पोहोचा

जर तुमचे वाहन चालवण्यायोग्य असेल तर सर्वप्रथम ते रस्त्याच्या बाजूला नेऊन उभे करा, ज्यामुळे रस्त्यातील वाहतुकीस अडथळा होणार नाही. जर असे करणे शक्य नसेल तर वाहन जिथे आहे तिथेच सोडून द्या. शक्य असेल तर वाहनातून बाहेर निघून वाहतुकी पासून दूर व्हा.

३. अपघातात अडकलेल्या इतर लोकांची चौकशी करा

अपघातात जखमी झालेल्या इतर लोकांचीही चौकशी करून आवश्यकता असेल तर तसेच तुम्ही त्यासाठी सक्षम असाल तर त्यांच्या उपचारासाठीही प्रयत्न करा.

४. पोलिसांना फोन करा

लहानातील लहान अपघातासाठीही पोलिसांच्याद्वारे बनवलेला ‘अपघात सूचना तपशील’ विमा कंपनी किंवा इतर वाहन चालकांसाठी तडजोड करायला उपयुक्त ठरतो. तुम्हाला अपघातस्थळी पोलीस कर्मचाऱ्यांना अपघाताच्या तपासासाठी मदत करणे आवश्यक आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना अपघाताच्या घटनेची निष्पक्ष तपास करू द्या आणि अपघातासाठी नक्की कोण जबाबदार आहे याची माहिती मिळवू द्या.

जर पोलीस अपघातस्थळी येऊ शकत नसतील तर तुमच्या जवळपास असणाऱ्या पोलिस ठाण्यात जाऊन अपघाताची फिर्याद द्यावी तसेच या फिर्यादीची एक प्रत तुमच्याकडे ठेवा.

५. सूचना एकत्र करा

तुम्ही अपघातात सापडलेल्या व्यक्ती तसेच वाहनांची मिळवू शकाल इतकी माहिती एकत्र करा. जसे की:

  • वाहनचालकांचे पूर्ण नाव आणि पत्ता
  • विमा कंपनीचे नाव आणि पॉलिसी क्रमांक
  • सर्व वाहनांचा प्रकार, रंग, मॉडेल आदी
  • वाहनांचा नोंदणी क्रमांक
  • अपघाताची तारीख, वेळ आणि ठिकाण

६. अपघात स्थळाची माहिती घ्या

जर अपघातावेळी तुमच्याकडे कॅमेरा किंवा स्मार्टफोन असेल तर पुराव्यासाठी अपघात स्थळ तसेच अपघातात वाहनांचे झालेल्या नुकसानाचे छायाचित्र अवश्य घ्या. हे छायाचित्र विमा कंपनीकडे नुकसानाचा दावा करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

७. विम्याचा दावा करावा

विमा कंपनीला संपर्क करून वाहनाच्या दुरुस्तीची व्यवस्था करावी. यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे जसे की पोलिसांनी तयार केलेले अपघात सूचना तपशील तसेच अपघात ग्रस्त वाहनातील इतर व्यक्ती, वाहने तसेच संपत्तीची माहितीही तयार करावी. विमा कंपनीस अपघाताच्या तपासासाठी सहकार्य करावे. ज्यामुळे सर्व नुकसान भरपाई मिळू शकेल.

अपघाताअगोदर तुम्ही काय करू शकता?


जर अजूनपर्यंत तुम्हाला कोणत्याही अपघातास सामोरे जावे लागले नसेल तर स्वतःला चांगला वाहनचालक आणि भाग्यवान व्यक्ती समजून देवाचे आभार माना. आम्ही आशा करतो की भविष्यातही तुम्हाला अशा संकटाचा सामना करावा लागू नये. परंतु तरीही वाईट परिस्थितीसाठी तुम्हाला तयार रहावे लागेल त्यासाठी तुम्ही आमच्या खालील सूचनांचे पालन करू शकता.

  • आपल्यासोबत नेहमी प्रथमोपचाराचे साहित्य ठेवा.
  • वाहन चालवत असताना वाहनाविषयी सर्व आवश्यक कागदपत्रे (ड्रायव्हिंग लायसन, नोंदणी प्रमाणपत्र, विमा आदी, तसेच आपत्कालीन सेवांचे संपर्क क्रमांक रक्तगट)
  • घराबाहेर पडण्यापूर्वी नेहमीच तुमचा फोन पूर्णपणे चार्ज करून घ्या.
  • सीटवर मोकळे सामान ठेवू नये. अपघातावेळी हे साहित्य हवेत उडाल्यामुळे तुम्हाला गंभीर दुखापती होऊ शकतात.

नियमितपणे काही वर्षांच्या कालावधीनंतर "सुरक्षित वाहनचालक अभ्यासक्रम" पूर्ण करून वाहन चालवण्याचा परिस्थितीविषयी तुमची माहिती वाढवा. त्यामुळे तुम्ही एक सतर्क जबाबदारी समजणारा आणि सुरक्षित वाहन चालक बनत असता.

नेहमी सुरक्षित आणि सकुशल रहा !!

 

 

शब्द ज्ञान

निवल लाभ करना (क्रिया)

अर्थ:- * शुद्ध लाभ कमाना।

उदाहरण:- हमारे संस्थान ने इस साल एक करोड़ का शुद्ध लाभ कमाया।

पर्यायवाची:- निवल आय करना, शुद्ध आमदनी करना, शुद्ध आय करना, शुद्ध बचत करना, शुद्ध लाभ कमाना