सर्वांची सुरक्षा आणि परिवहन व्यवस्था सुव्यवस्थितपणे चालण्याच्या दृष्टीने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतुकीचा नियमांचे उल्लंघन केल्यास संपत्ती आणि जीविताचेही नुकसान होऊ शकते. यामुळे परिवहन सेवांमध्येही अडथळा येऊ शकतो.
वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चलन करण्यास प्रवृत्त करू शकते. वाहन चालवत असताना सोबत आवश्यक कागदपत्रे ठेवली नसतील तरीही चलन भरावे लागू शकते. भारतात वाहन चालवत असताना तुमच्यासोबत खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- वाहन चालक परवाना (मूळ)
- वाहनाच्या नोंदणीचे प्रमाणपत्र (खाजगी वाहनांसाठी प्रमाणित प्रत आणि व्यावसायिक वाहनांसाठी मूळ प्रत)
- वाहनाच्या विम्याचे प्रमाणपत्र (प्रमाणित प्रत)
- प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (हे मूळ प्रमाणपत्र फक्त काही राज्यांमध्ये आवश्यक आहे संपूर्ण देशात नाही.)
वाहनासोबत वरील कागदपत्रे नसल्यास ते वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन समजले जाते. जर तुम्ही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर वाहतूक पोलीस चलन जारी करू शकतात. काही विशिष्ट परिस्थितीत जसे की अवैध पद्धतीने रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी वाहन उभे केल्यास ते जप्तही केले जाऊ शकते.
तुम्ही उल्लंघन केलेल्या वाहतूक नियमाच्या गंभीरतेनुसार आर्थिक दंडाची रक्कम निश्चित केली जाते. चला जाणून घेऊया की तुम्हाला चलन जारी केल्यास काय करावे लागेल. चलन जारी करण्यात आल्यास तुमच्यापुढे दोन पर्याय उपलब्ध असतील.
आर्थिक दंड भरावा
तुम्ही आर्थिक दंड वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने चलन जारी केल्यानंतर भरू शकता. यावेळी आर्थिक दंड भरल्याची पावती घेणे विसरू नका. न्यायालयात त्यानंतरही आर्थिक दंड भरता येतो.
जर चलन तुम्हाला टपालाद्वारे पाठवण्यात आले असेल तर त्या चलनावर केलेला उल्लेख केलेल्या न्यायालयात जाऊन आर्थिक दंड रक्कम भरू शकता.
आर्थिक दंड देय तारखेच्या अगोदर भरण्यात यावा अन्यथा त्याची रक्कम अधिक प्रमाणात भरावी लागू शकते.
चलनाचा प्रतिवाद करणे
जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही वाहतुकीचा कोणत्याही नियमाचे उल्लंघन केलेले नाही आणि गैरसमजातून तुमच्यासाठी चलन जारी करण्यात आले आहे. अशावेळी तुम्ही न्यायालयासमोर जाऊन निर्दोष असल्याचे सिद्ध करू शकता.
स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी न्यायाधीशांसमोर आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सादर करून आपले म्हणणे मांडावे. न्यायाधीशाने दिलेल्या निकालाचे आदरपूर्वक पालन करणे ही तुमची जबाबदारी आहे.
वाहतूक चलनाकडे गांभीर्याने पहावे आणि वेळीच त्याचा निपटारा करावा.
चलनावेळी तुमचे अधिकार
कोणत्याही प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला चलन भरावे लागू शकते. वाहतूक पोलिसांच्याद्वारे जारी करण्यात आलेल्या चलनाविषयी तुमचे अधिकार पुढीलप्रमाणे असतात.
ट्रॅफिक चलन कोण जारी करू शकता?
फक्त वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी वाहतूक चलन जारी करू शकतात. हेडकॉन्स्टेबल किंवा त्याच्या वरील पदावर कार्यरत असणारे अधिकारीच चलन जारी करू शकतात.
अधिकाऱ्यांच्या गणवेशावर खांद्याच्या वरील बाजूस ‘व्ही’ आकाराच्या ३ फितीवरून हेड कॉन्स्टेबल ओळखता येऊ शकतो. परंतु तो त्या नियमांच्या उल्लंघनासाठीच चलन जारी करू शकतो. त्यासाठी प्रती उल्लंघन चलन रक्कम शंभर रुपयेपेक्षा जास्त असू नये. परंतु एकाहून अधिक उल्लंघन झाल्यास हेड कॉन्स्टेबल तुमच्यासाठी विभिन्न चलनेही जारी करू शकतो.
उदाहरणार्थ, जर तुम्ही रेड सिग्नलचे उल्लंघन करण्यासोबतच हेल्मेटशिवाय दुचाकी वाहन चालवताना आढळल्यास या दोन्ही नियमांच्या उल्लंघनासाठी हेड कॉन्स्टेबल तुम्हाला शंभर रुपयांची दोन चलने जारी करू शकतो.
परंतु हेड कॉन्स्टेबलला व्यावसायिक वाहनांची चलने जारी करण्याचा अधिकार नाही.
पोलीस नोंदणी दस्तऐवज (आरसी) आणि ड्रायव्हिंग लायसन्स जप्त करू शकतात?
वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी तुमच्याकडे नोंदणी प्रमाणपत्र, वाहन चालवण्याचा परवाना, विमा प्रमाणपत्र आधी दाखवण्यास सांगू शकतात. परंतु याबाबतच्या नियमानुसार वरीलपैकी कोणतीही कागदपत्रे त्यांना देण्यास तुमच्यावर बंधन नाही. परंतु जर तुमचे वाहतूक नियम उल्लंघन अशा कलमांतर्गत येत असतील ज्यामध्ये न्यायालयात जाणे अनिवार्य असते. अशा वेळी तुम्हाला वाहतूक पोलिसांनी मागणी केलेली कागदपत्रे सोपवावी लागतात.
खालील परिस्थितीत तुम्हाला कागदपत्रे वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांना देणे आवश्यक असते.
- चलन जारी करण्यात आल्यानंतर तुमच्याकडे चलनाची रक्कम भरण्यासाठी आवश्यक इतके पैसे नसणे. अशा वेळी तुम्ही न्यायालयात जाऊन चलनाचे पैसे भरल्यावर आपली कागदपत्रे पुन्हा मिळवू शकता.
- जर तुम्ही चलनाला न्यायालयात आव्हान देणार असाल तर तुम्ही वाहन चालवण्याचा परवाना किंवा इतर कागदपत्रे वाहतूक पोलिसांकडे देऊन न्यायालयाकडे दाद मागू शकता.
- निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक मद्यपान करून वाहन चालवणे. यासाठी पोलिस अधिकाऱ्यांच्या कडून श्वास निरीक्षण यंत्राचा वापर करण्यात येतो. या यंत्राद्वारे केलेले निरीक्षण न्यायालयात मान्य पुरावा मानला जातो. परंतु तुम्ही यालाही न्यायालयात आव्हान देऊ शकता. कृपया लक्षात ठेवा कि पोलीस कर्मचारी श्वास निरीक्षण करतेवेळी एक व्हिडिओही तयार करीत असतात.
- असे वाहन चालवणे जे चालवण्यासाठी असुरक्षित आहे.
- खाजगी वाहन विना नोंदणी आणि व्यावसायिक वाहन विना परवाना चालवणे.
परंतु लक्षात ठेवा की, विना पावती वाहतूक पोलीस तुमच्याकडून कागदपत्रे घेऊन जाऊ शकत नाहीत.
पोलीस वाहनाची चावी काढून घेऊ शकतात का?
नियमांच्या अनुसार तुम्ही तुमच्या वाहनाची चावी वाहतूक पोलिस अधिकाऱ्याला सोपवण्यास बाध्य नसता परंतु काही विशिष्ट परिस्थितीत ते चावी घेऊन चलन जारी करण्याबरोबरच तुमचे वाहननही जप्त करू शकतात.
खालील परिस्थितीत तुमचे वाहन जप्त केले जाऊ शकते:
- निर्धारीत प्रमाणापेक्षा अधिक मद्यपान करून वाहन चालवणे.
- विना ड्रायव्हिंग लायसन वाहन चालवणे.
- अल्पवयीन मुलाद्वारे वाहन चालवणे.
- विना नोंदणीचे वाहन चालवणे.
- विना अनुमति प्रमाणपत्र (परवाना) किंवा परवान्यानुसार निर्धारित अटींचे उल्लंघन करून व्यावसायिक वाहन चालवणे.
पोलीस कोणत्या परिस्थितीत चलन जारी करू शकतात?
वाहतूक पोलीस अधिकारी पांढऱ्या रंगाचा गणवेशात असणे आवश्यक आहे. त्यावर संबंधित राज्याचा बॅज असणे आवश्यक आहे. गणवेशावर त्याच्या नावाची पट्टी असावी. त्याच्याजवळ चलन पुस्तक किंवा "ई चलन यंत्र" असले पाहिजे. नियमाप्रमाणे वरील सर्व गोष्टींशिवाय तो चलन जारी करू शकत नाही.
चलन जारी करण्याची परिस्थिती आणि आर्थिक दंडाविषयी माहिती
अलीकडेच संसदेत मंजूर करण्यात आलेल्या नवीन मोटार वाहन अधिनियम २०१९ नुसार वाहतूक नियमांच्या उल्लंघनासाठी आर्थिक दंडाची रक्कम खूप मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे. हा लेख मोटार वाहन अधिनियम करण्यात आलेल्या बदलाविषयी माहिती प्रदान करतो. वाहतूक नियम उल्लंघन आणि दंडाच्या तरतुदीविषयी (आर्थिक आणि कारावास) सविस्तर माहिती या प्रेस नोटमध्ये उपलब्ध आहे.