ई-चलन

विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं

e-challanवाहतूक पोलीस कर्मचारी परिवहन सेवांना भारतातील रस्त्यांवर सुरळीतपणे सुरू ठेवण्यासोबच वाहतूक नियंत्रित करण्याचे आणि त्यावर देखरेख करण्याचे काम करीत असतात. वाहतुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी ते आवश्यक ही कारवाई करतात. वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास किंवा इतर लोकांसाठी धोका निर्माण झाल्यास संबंधितांना चलन भरण्यास प्रवृत्त करतात.

इंटरनेट तसेच इतर आधुनिक उपकरणांच्या आगमनामुळे चलन जारी करण्याची प्रक्रियाही बदलत आहे. हळूहळू वाहतूक पोलीस नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनाही ई चलन जारी करण्याच्या दिशेने काम करीत आहे. जुन्या पद्धतीमध्ये चलन एकमेकांपासून वेगवेगळ्या प्रकारचे असत परंतु ई-चलन प्रक्रियेत सर्व प्रकारचे वाहतूक उल्लंघने केंद्रीयकृत पद्धतीच्या माध्यमातून नोंद केली जातात. ही प्रणाली नजीकच्या भविष्यात वारंवार वाहतुकीच्या नियमांचा बंद करणाऱ्या वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन रद्द करण्याच्या दिशेने घेऊन जाईल.

ई-चलन काय आहे आणि हे कोण जारी करू शकते?


वाहतुकीच्या कोणत्याही नियमांच्या उल्लंघनासाठी वाहन चालकांना इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून जारी केल्या जाणाऱ्या चलनाला ई चलन असे म्हणतात. हे ई चलन वाहतूक पोलिसाद्वारे हँडहेल्ड उपकरणाच्या माध्यमातून किंवा सीसीटीव्ही सक्षम इलेक्ट्रॉनिक चलन प्रणालीद्वारे जारी केले जाऊ शकते. याविषयी माहिती केंद्रीकृत प्रणालीमध्ये नोंद केली जाते. या प्रणालीत देशभरातील चलनांची नोंद ठेवलेली असते. ई चलनात वाहन, चालक, उल्लंघनाचे ठिकाण, नियम उल्लंघनाचा प्रकार आणि चालक किंवा वाहनाच्या मालकाद्वारे पुढे कराव्या लागणाऱ्या कार्यवाहीविषयी महत्वपूर्ण माहिती दिलेली असते.

वाहतूक पोलीस अधिकारी केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८८ अन्वये चलन जारी करू शकतो. या विषयात महामार्ग पोलिसांनाही वाहतूक पोलिसांप्रमाणेच महामार्गावर नियमांच्या उल्लंघनासाठी चलन जारी करण्याचा अधिकार आहे. त्यांच्याजवळ एक ई चलन एप असते जे सारथी आणि वाहन पोर्टल जोडलेले असते. यामुळे चलन जारी करण्याची प्रक्रिया केंद्रीकृत आणि ऑटोमॅटिक बनते.

लक्षात ठेवा: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास वाहन अस्थायी स्वरूपात जप्तही केले जाऊ शकते.

ई चलनाचे सत्यापन आणि पेमेंट


e-challan details तुम्ही इंटरनेट आणि कॉम्प्युटर यांचा वापर करून ई चलनाचे सत्यापन आणि ऑनलाइन पेमेंट करू शकता. ई चलनाद्वारे सूचना एसएमएसच्या माध्यमातून दिली जाते. त्यामध्ये घटनेची वेळ, स्थान, प्रकार याबाबत सविस्तर माहिती दिलेली असते. ई चलनाचे सत्यापन ई-चलन वेबसाइटवरही केले जाऊ शकते. यासाठी चित्रांमध्ये प्रदर्शीत आवश्यक प्रक्रिया करावी लागते.

डेबिट-क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा उपयोग करूनही तुम्ही ई चलनाच्या दंडाची रक्कम भरू शकता. अनेक ई वॉलेट कंपन्या ई चलनाचे पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून देतात.

ई-चलन प्रक्रियेत नागरिकांचे अधिकार


ई चलन प्रक्रियेत नागरिकांचे अधिकार सामान्य चलन प्रक्रियेप्रमाणेच असतात. याचे वर्णन ट्रॅफिक चलन पृष्ठावर करण्यात आले आहे.

ई चलनविषयी प्रतिवाद करा


जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले नाही. तरीही तुम्हाला चलन जारी करण्यात आले आहे तर तुम्ही याबाबत प्रतिवादही करू शकता. तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी न्यायाधीशांसमोर आवश्यक पुरावे आणि कागदपत्रे ठेवून तुमची बाजू मांडू शकता. ई चलन जारी झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत तुम्हाला तुम्हाला एक तर आर्थिक दंडाची रक्कम भरावी लागेल किंवा चलनाचा प्रतिवाद करणे आवश्यक असेल. असे न केल्यास न्यायालय समन्स जारी करू शकते.

 

 

शब्द ज्ञान

लोहा भंडार (संज्ञा)

अर्थ:- लोहे का भंडार।

उदाहरण:- इस क्षेत्र में लौह भंडार की खोज जारी है।

पर्यायवाची:- लौह भंडार