वाहन चालक परवान्याविषयी विचारले जाणारे सामान्य प्रश्न

विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं

ड्रायव्हिंग लायसन्सविषयी आवश्यक असणारी माहिती एकत्र संकलित करणे हे एक कठीण काम आहे. इतकेच नाही तर भरपूर माहिती संकलित केल्यानंतरही तुमचे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहू शकतात. इथे आम्ही याच विषयाशी संबंधित काही सामान्य प्रश्नांची उत्तरे देत आहोत, जी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतील.


प्रशिक्षणार्थी (लर्नर) लायसन्ससाठी वैद्यकीय तपासणी (मेडिकल फिटनेस) अर्ज (फॉर्म) भरणे आवश्यक आहे का?

प्रशिक्षणार्थी लायसन्ससाठी सर्व अर्जदारांना वाहन चालवण्यासाठी तंदुरुस्त असणे आवश्यक असते. त्यांना स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीची माहिती अर्ज क्रमांक एक मध्ये द्यावी लागते. तसेच वैद्यकीय तंदुरुस्तीचे प्रमाणपत्रही अर्ज क्रमांक एक ए सोबत जोडावे लागते.

मी अर्जामध्ये दिलेल्या माहितीमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास मला काय करावे लागेल?

हा अर्ज परिवहन कार्यालयाकडे जमा केल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती करणे शक्य नसते. त्यामुळे तुम्हाला हा अगोदरचा अर्ज रद्द करून नव्याने अर्ज दाखल करावा लागेल. तरीही तुम्ही अगोदरच्या अर्जासाठी जमा केलेले शुल्क परत मिळणार नाही.

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे?

यासाठी तीन नियमांचे पालन प्रशिक्षणार्थी लायसन धारकांना करावे लागेल.

  1. आपल्या वाहनाच्या पुढे तसेच मागे इंग्रजी ‘एल’ चिन्ह चिकटवावे.
  2. वाहन चालवत असताना तुमच्या सोबत अशी एक व्यक्ती असावी जिच्याकडे वैध कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स असले पाहिजे.
  3. तुम्ही वाहनात तुमच्यासोबत प्रशिक्षकाशिवाय कोणत्याही इतर व्यक्ती किंवा प्रवाशाला बसवू शकत नाही.

जर मी लर्निंग लायसन्स परीक्षा देण्यासाठी पोहोचू शकलो नाही तर मला काय करावे लागेल?

तुम्हाला लायसन्स परीक्षेसाठी नव्याने वेळ निश्चित करून घ्यावी लागेल.

जर मी लर्निंग लायसन्स परीक्षेत अनुत्तीर्ण झालो तर मला काय करावे लागेल?

अशा परिस्थितीत तुम्हाला नव्याने परीक्षा शुल्क भरून पुन्हा एकदा परीक्षेसाठी वेळ निश्चित करून घ्यावी लागेल.

जर मी वाहन चालक परीक्षा (रोड टेस्ट) मध्ये अनुत्तीर्ण झालो तर मला काय करावे लागेल?

जर तुम्ही वाहन चालक परीक्षेत अनुत्तीर्ण झाला तर सात दिवसांनंतर तुम्हाला फेर परीक्षेसाठी अर्ज करावा लागेल.

मी लर्निंग लायसन्सचा कालावधी संपल्यानंतरही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकतो का?

नाही तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी लर्निंग लायसन्सचा कालावधी समाप्त होण्यापूर्वीच अर्ज करावा लागेल. जर लर्निंग लायसन्सचा कालावधी समाप्त झाला असेल तर तुम्हाला नव्याने त्यासाठी अर्ज करावा लागेल.


लर्निंग लायसन्स माझ्या निवासी राज्याच्या बाहेरही वैध असते का?

होय. लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स संपूर्ण भारतामध्ये वैध मानले जाते.

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स किती कालावधीसाठी वैध असते?

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स ६ महिन्यांसाठी वैध मानले जाते.

ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता किती कालावधीसाठी असते?

  • जर ड्रायव्हिंग लायसन्स परिवहन (ट्रान्सपोर्ट) संबंधित वाहनासाठी जारी करण्यात आले असेल तर त्याची वैधता जारी/नूतनीकरण करण्यासाठी दिलेल्या तारखेपासून ५ वर्षांसाठी निश्चित केलेली असते.
  • अन्य प्रकारच्या ड्रायव्हिंग लायसन्स (नॉन ट्रान्सपोर्ट वाहनांसाठी) वैधता नियम अशाप्रकारे निश्चित केलेले आहेत. जर लायसन्स प्राप्त केलेला व्यक्ती:-
    1. लायसन्स जारी / नूतनीकरण होण्याच्या कालावधीपर्यंत ३० वर्षांचा झाला नसेल तर ते लायसन्स संबंधित व्यक्तीच्या वयाच्या ४० वर्षापर्यंत वैध धरले जाते.
      किंवा
    2. लायसन्स जारी / नूतनीकरण होण्याच्या कालावधीपर्यंत ३० वर्षांपेक्षा अधिक परंतु ५० वर्षापेक्षा कमी असेल तर लायसन्स जारी/नूतनीकरण करण्याच्या तारखेपासून १० वर्षाच्या कालावधीपर्यंत वैध मानले जाते.
      किंवा
    3. लायसन्स जारी किंवा नूतनीकरण करण्याच्या वेळेपर्यंत ५० वर्षाहून अधिक परंतु ५५ वर्षाहून कमी असेल तर ते लायसन्स संबंधित व्यक्ती ६० वर्षांचा होईपर्यंत वैध मानले जाते.
      किंवा
    4. लायसन्स जारी / नूतनीकरण होण्याच्या तारखेपर्यंत संबंधित व्यक्ती ५५ वर्षे वयाची असेल तर लायसन्स जारी/नूतनीकरण करण्याच्या तारखेपासून ५ वर्षांच्या कालावधीपर्यंत वैध मानले जाते.

धोकादायक वस्तू (hazardous goods) सोबत वाहने चालवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या लायसन्सवर समर्थन/पुष्टीपत्रची (इंडोर्समेंट) वैधता किती असते?

३ वर्षे.

जर मी विहीत कालावधीत माझे ड्रायव्हिंग लायसन्स नुतनीकरण (रिन्युअल) करणे विसरलो तर त्यासाठी पुढील प्रक्रिया काय आहे?

जर तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करणे विसरला तर तरी तुम्ही हा कालावधी संपण्याच्या पाच वर्षाच्या आत पुन्हा नवीन लायसन्ससाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला दंडाची रक्कम भरावी लागेल.

परंतु यासाठी तुम्हाला ही माहिती असली पाहिजे की ड्रायव्हिंग लायसन्सचा कालावधी संपला असताना वाहन चालवणे हा एक दंडनीय अपराध आहे.

 

 

शब्द ज्ञान

अभाषण (संज्ञा)

अर्थ:- चुप रहने की अवस्था या क्रिया।

उदाहरण:- पंडितजी के प्रश्न पूछते ही सभा में चुप्पी छा गयी।

पर्यायवाची:- ख़ामोशी, खामोशी, चुप्पी, मौन