चेतावणीपूर्ण रस्ता चिन्ह

विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें

रस्त्यावरील चेतावणीपूर्ण चिन्हे (वाहतूक चिन्हे) एखाद्या सल्ल्याप्रमाणे असतात. वाहनचालकांना ही चिन्हे पाहिल्यानंतर काहीतरी कृत्य केलेच पाहिजे असे बंधनकारक नसते. ही चिन्हे रस्त्याचा वापर करणाऱ्यांना एखाद्या गोष्टीविषयी किंवा रस्त्याच्या स्थितीविषयी चेतावणी देत असतात. सुखरूप प्रवासासाठी वाहन चालकांना माहिती उपलब्ध करून देतात. या चिन्हांच्याकडे दुर्लक्ष केल्यास अपघात घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

बहुतांशी चेतावणीपूर्ण रस्ता चिन्हे त्रिकोणी आकाराची असतात, व त्यांची परिमिती लाल रंगाची तर पृष्ठभाग पांढऱ्या रंगाचा असतो. चिन्हाच्या मधोमध काळ्या रंगात एखादी आकृतीही असू शकते. तरीही या नियमास काही अपवादही आहेत. उदाहरणार्थ गोल आकाराचे चिन्ह, याची आकृती गोल तर पृष्ठभाग निळ्या रंगाचा असतो.

आम्ही इथे प्रमुख चेतावणीपूर्ण चिन्हांचे सचित्र वर्णन केले आहे.

डावे वळण

डावे वळण रस्ता चिन्हरस्त्यावर पुढे डाव्या बाजूला वळण आहे (घुमाव) तीव्र वेगामध्ये वाहन घसरू शकते. त्यामुळे वाहनधारकांनी काळजीपूर्वक वाहन चालवावे. जर रस्त्याच्या मध्ये दुभाजक (डिव्हायडर) नसेल तर समोरून येणारे वाहन तुम्हाला अगदी जवळ आल्यानंतरच दृष्टीस पडू शकते.

उजवे वळण

उजवे वळण रस्ता चिन्हरस्त्यावर पुढे उजव्या बाजूला वळण आहे. तीव्र वेगामध्ये वाहन घसरू शकते. त्यामुळे वाहनधारकांनी काळजीपूर्वक वाहन चालवावे. जर रस्त्याच्या मध्ये दुभाजक (डिव्हायडर) नसेल तर समोरून येणारे वाहन तुम्हाला अगदी जवळ आल्यानंतरच दृष्टीस पडू शकते.

अरुंद पूल

अरुंद पूल रस्ता चिन्हपुढे एक अरुंद पूल आहे ज्याची रुंदी रस्त्यापेक्षा कमी आहे. वाहन कमी वेगाने तसेच काळजीपूर्वक चालवावे. पुलावर पुढील बाजूने येणाऱ्या वाहनांना रस्ता उपलब्ध करून द्यावा. अरुंद पुलावर काळजीपूर्वक वाहन चालवावे आणि वाहतुकीच्या कोंडीपासून वाचण्यासाठी शिस्त बाळगणे आवश्यक आहे.

अरुंद रस्ता

अरुंद रस्ता चिन्हपुढे रस्त्याची रुंदी कमी होणार आहे. अधिक वेगाने वाहन चालवल्यास पुढून येत असणाऱ्या वाहनाशी टक्कर होऊ शकते. त्यामुळे सुरक्षित राहण्यासाठी काळजी बाळगावी आणि वाहतुकीच्या कोंडीपासून बचाव करावा.

गोल चक्कर

गोल चक्कर रस्ता चिन्हपुढे गोल चक्कर आहे. गोल चक्राच्या आधी रस्त्यावर एक चिन्हही असू शकते. गोल चक्रामध्ये आधीपासून उपस्थित असणाऱ्या वाहनांना रस्ता द्यावा आणि काळजीपूर्वक प्रवेश करावा.

वाहतूक संकेत

 वाहतूक संकेत रस्ता चिन्हपुढे एक वाहतूक संकेत आहे. वाहनाचा वेग कमी करणे सुरू करावे तसेच थांबण्यासही तयार रहावे. वाहतुकीचा संकेत लाल झाल्यानंतर तुम्हाला थांबावे लागेल.

रेल्वे फाटक

रेल्वे फाटक रस्ता चिन्हपुढे एक रेल्वे मार्ग आहे आणि त्याच्यावर सुरक्षिततेसाठी फाटक (रेल्वे क्रॉसिंग) बसवण्यात आले आहे. ट्रेन आल्यानंतर सुरक्षा कर्मचारी फाटक बंद करेल. वाहन चालकांना अधिक काळजी बाळगावी लागेल.

विना रेल्वे फाटकाचा रेल्वे मार्ग

विना रेल्वे फाटकाचा रेल्वे मार्ग रस्ता चिन्हपुढे रेल्वेमार्ग आहे आणि तिथे सुरक्षा कर्मचारी आणि फाटक नाही. याला मानवरहित रेल्वे क्रॉसिंग असेही म्हणतात. वाहनचालकाने इथे थांबण्यापूर्वी एखादी ट्रेन येत नसल्याची खात्री करावी आणि त्यानंतरच रेल्वे मार्ग ओलांडावा.

उभा चढ

उभा चढ रस्ता चिन्हरस्त्यावर पुढे उभा चढ आहे. या चिन्हासोबत काही आणखी सूचनाही असू शकतात ज्या चढाच्या मार्गाची लांबी सांगत असतात. सामान्यपणे हे चिन्ह डोंगरी विभागातील रस्त्यांवर पहायला मिळते.

सरळ उतार

सरळ उतार रस्ता चिन्हरस्त्यावर पुढे एक सरळ उतार आहे. या चिन्हासोबत आणखीही काही सूचना असू शकतात ज्या उताराच्या रस्त्याची लांबी सांगतात. सामान्यपणे हे चिन्ह डोंगरी विभागातील रस्त्यांवर पहायला मिळते. इथे वाहनाचा वेग कमी ठेवावा.

रस्त्याचे काम सुरु

रस्त्याचे काम सुरु रस्ता चिन्हहे चिन्ह दर्शवते की रस्त्यावर दुरुस्ती किंवा नवीन बांधणीचे काम सुरू आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी हे चिन्ह लावण्यात येते. येथे कमी वेगाने वाहन चालवावे आणि कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी.

शाळा / विद्यालय

शाळा / विद्यालय रस्ता चिन्हहे चिन्ह वाहनचालकांना सूचित करते की जवळपास एखादी शाळा किंवा विद्यालय आहे. (स्कूल) मुले बहुतांश वेळा धावत किंवा गडबडीत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात. मुलांच्या सुरक्षिततेसाठी इथे काळजीपूर्वक वाहन चालवावे.

निसरडा रस्ता

निसरडा रस्ता रस्ता चिन्हपुढे रस्ता निसरडा आहे. रस्त्याची ही घसरण अनेक कारणांमुळे असू शकते. उदाहरणार्थ. रस्त्यावरील पाणी बर्फ किंवा तेलासारखे वाहन घसरण होऊ शकणारे पदार्थ. इथे अपघात टाळण्यासाठी वाहनाचा वेग कमी ठेवावा.

गतिरोधक किंवा व असमान रस्ता

गतिरोधक किंवा व असमान रस्ता रस्ता चिन्हहे चिन्ह दर्शवते की पुढील रस्ता असमान किंवा चढ-उतार असणार आहे. अनेक वेळा हे चढ उतार वाहतुकीचा वेग कमी करण्यासाठी निर्माण केलेले असतात. त्यांना गतिरोधक किंवा स्पीड ब्रेकर असेही म्हणतात. इथे वाहनाचा वेग कमी ठेवावा.

 

 

शब्द ज्ञान

झूँमना (क्रिया)

अर्थ:- बार-बार आगे-पीछे, ऊपर-नीचे या इधर-उधर होना।

उदाहरण:- हरी-भरी फसलें हवा में लहरा रही हैं।

पर्यायवाची:- झूमना, झोंका खाना, लहकना, लहरना, लहराना, लहरें खाना