सूचनात्मक रस्ता चिन्ह (वाहतूक / ट्राफिक संकेत) आपल्याला रस्त्यावर किंवा त्याच्याजवळ उपलब्ध असणाऱ्या सुविधांची माहिती देत असतात. या प्रकारची चिन्हे पुढे येणार्या स्थळांची नावे अंतर तसेच जोडला जाणारा रस्ता पुढे कुठे जातो याचीही माहिती प्रदान करतात.
सूचनात्मक चिन्ह आयताकृती असते. त्याचा पृष्ठभाग निळ्या रंगाचा असतो तर त्याच्यावर पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची आकृती किंवा अक्षरे असतात.
आम्ही या ठिकाणी प्रमुख सूचनात्मक रस्ता चिन्हांचे सचित्र वर्णन केले आहे.
पेट्रोल पम्प
पुढे एक पेट्रोल पंप आहे जर तुमच्या वाहनात कमी इंधन असेल तर तुम्ही याठिकाणी इंधन भरू शकता.
दूरध्वनी (टेलिफोन) बुथ
पुढे एक सार्वजनिक दूरध्वनी (टेलिफोन) बुथ आहे. आवश्यकता भासल्यास तुम्ही या ठिकाणावरून कोणाशी तरी संवाद साधू शकता.
बस स्टॉप
इथे एक बस स्टॉप आहे. या चिन्हासोबत काही अतिरिक्त सूचनाही असू शकतात. उदाहरणार्थ या ठिकाणावरून एखाद्या मार्गावरील बसेस ये जा करतात.
पादचारी पारपथ (झेब्रा क्रॉसिंग)
इथे पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडायला एक रस्ता आहे. हे चिन्ह काळा व पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यापासून तयार केलेले असल्यामुळे त्याला झेब्रा क्रॉसिंग असेही संबोधण्यात येते. इथे काळजीपूर्वक वाहन चालवावे आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडू द्यावा.
प्राथमिक उपचार
इथे दवाखाना आहे जो प्रथम उपचार सेवा प्रदान करत आहे. आवश्यकता भासल्यास प्राथमिक उपचारांसाठी येथे थांबता येईल.
चिकित्सालय
रस्त्याच्या जवळ एक चिकित्सालय आहे (हॉस्पिटल) इथे लोकांना ॲडमिट करण्यासोबत अनेक प्रकारचा चिकित्सा सुविधा उपलब्ध आहेत.
जलपान
रस्त्याच्या शेजारी चहा नाश्ता स्नॅक्स आदीची दुकाने आहेत.
भोजन
इथे एक ढाबा (रेस्टॉरंट) आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि भोजन उपलब्ध आहे.
पार्किंग
इथे एक पार्किंग स्थळ आहे किंवा रस्त्याच्या कडेला वाहने थांबवण्याची अनुमती आहे. पार्किंग चिन्हाच्या खाली आणखी एक चिन्ह असू शकते. जे सांगू शकते की इथे कोणत्या प्रकारची वाहने उभी केली जाऊ शकतात.
गतिरोधक
चिन्हावर बाजूला रस्ता बंद आहे किंवा वाहनांना पुढे जाण्यासाठी पुरेसा रस्ता नाही. जर तुम्हाला त्या दिशेने पुढे जायचे असेल तर दुसरा रस्ता वापरावा.
पादचारी मार्ग
हे चिन्ह दर्शवते की पादचाऱ्यांसाठी कोणत्या दिशेने मार्ग बनवला आहे. (रस्ता) इतर दिशांना चालणे पादचाऱ्यांसाठी सुरक्षित नसण्याची शक्यता आहे.
सायकल मार्ग
हे चिन्ह दर्शवते की कोणत्या दिशेला सायकलसाठी मार्ग बनवला आहे. (रस्ता) इतर दिशांना सायकल चालवणे सायकलस्वारांसाठी सुरक्षित नसल्याची चिन्हे आहेत.