अनिवार्य रस्ता चिन्ह

विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें

अनिवार्य रस्ता चिन्ह (संकेत) आदेशाप्रमाणे असतात, ज्यांचे पालन रस्ता किंवा संबंधित सेवांचा वापर करणाऱ्या प्रत्येक वापरकर्त्याला करणे बंधनकारक असते. अनिवार्य चिन्हांचे पालन न केल्यास घातक परिणाम उद्भवू शकतात तसेच जीवन आणि संपत्तीचे ही नुकसान होऊ शकते. अनिवार्य चिन्हांचे उल्लंघन करणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन मानले जाते आणि दोषींना दंडित केले जाऊ शकते. दंडाचा प्रकार आणि प्रमाण उल्लंघन केलेला नियम आणि त्याच्यामुळे उद्भवलेल्या नुकसानावर अवलंबून असतो.

अनिवार्य चिन्हे दोन वर्गांमध्ये विभागल्या जाऊ शकतात.

दिशात्मक रस्ता चिन्ह


ही चिन्हे दिशात्मक आदेश असतात. ड्रायव्हर्सना चिन्हावर नमूद केलेली दिशा पाळणे आवश्यक आहे. ही चिन्हे गोलाकार आकारात असून निळ्या रंगाच्या पृष्ठभागावर पांढऱ्या रंगांमध्ये दर्शवली जातात.

आम्ही या ठिकाणी अनिवार्य चिन्हांचे सचित्र वर्णन केले आहे.

डावीकडे वळावे

डावीकडे वळावे रस्ता चिन्हहे चिन्ह पाहिल्यानंतर डावीकडे वळणे अनिवार्य आहे. हे चिन्ह मार्ग परिवर्तनाच्या कारणासाठी लावण्यात येते.

उजवीकडे वळावे

उजवीकडे वळावे रस्ता चिन्हहे चिन्ह पाहिल्यानंतर उजवीकडे वळणे अनिवार्य आहे. हे चिन्ह मार्ग परिवर्तनाचा कारणासाठी लावण्यात येते.

डावीकडे राहावे

डावीकडे राहावे रस्ता चिन्हवाहतुकीच्या सुरळीत प्रवाहासाठी डाव्या बाजूला राहूनच वाहन चालवावे. हे चिन्ह प्रामुख्याने अशा रस्त्यांवर लावण्यात येते जिथे मध्यभागी विभाजक (डिव्हायडर) नसतो आणि रस्त्यावर दुतर्फा वाहतूक सुरू असते.

उजवीकडे राहावे

उजवीकडे राहावे रस्ता चिन्हवाहतुकीच्या सुरळीत प्रवासासाठी उजव्या बाजूला राहूनच वाहन चालवावे. हे चिन्ह प्रामुख्याने अशा रस्त्यांवर लावण्यात येते जिथे मध्यभागी विभाजक (डिव्हायडर) नसतो आणि रस्त्यावर दुतर्फा वाहतूक सुरू असते.

पुढे डावीकडे वळावे

पुढे डावीकडे वळावे रस्ता चिन्हपुढे जाऊन डावीकडे वळावे. हे चिन्ह प्रामुख्याने अशा रस्त्यावर लावण्यात येते, जिथे रस्त्याची डावी लेन समाप्त होणार असते आणि चालकाला डावीकडे वळणे अनिवार्य असते. सरळ पुढे जाण्यासाठी उजव्या लेनवर जावे (जर उपलब्ध असेल तर).

पुढे उजवीकडे वळावे

पुढे उजवीकडे वळावे रस्ता चिन्हपुढे जाऊन उजवीकडेकडे वळावे. हे चिन्ह प्रामुख्याने अशा रस्त्यावर लावण्यात येते, जिथे रस्त्याची उजवी लेन समाप्त होणार असते आणि चालकाला डावीकडे वळणे अनिवार्य असते. सरळ पुढे जाण्यासाठी डाव्या लेनवर जावे (जर उपलब्ध असेल तर).

पुढे सरळ जावे

पुढे सरळ जावे रस्ता चिन्हपुढे सरळ दिशेने जात राहावे. कोणत्याही दिशेला वाढण्याची अनुमती नाही.

सायकल मार्ग

सायकल मार्ग रस्ता चिन्हकाही रस्ते किंवा रस्त्याची एखादी लेन फक्त सायकलस्वारांसाठी आरक्षित असते. हे चिन्ह आरक्षणाचे प्रतीक आहे. इतर कोणत्याही प्रकारच्या वाहनांना रस्त्याच्या या लेनचा वापर करण्याची अनुमती नाही.


निषेधात्मक रस्ता चिन्ह


रस्ता चिन्हे जे चालकांना काही विशिष्ट कृत्ये करण्यास प्रतिबंध करतात त्यांना निषेधात्मक रस्ता चिन्हे असे म्हणतात. निषेधात्मक रस्त्यांच्या चिन्हेंबद्दल अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

 

 

शब्द ज्ञान

कवित्वपूर्ण (विशेषण)

अर्थ:- जिसमें काव्य का पुट हो या जो काव्य से भरा हुआ हो।

उदाहरण:- वह काव्यात्मक अंदाज में अपना वक्तव्य दे रही थी।

पर्यायवाची:- काव्यात्मक, रसात्मक, शायराना