अनिवार्य रस्ता चिन्हे ज्यामुळे वाहनचालकांना काही कृत्ये करण्यास मनाई असते किंवा काही प्रकारची सीमा निश्चित केली जाते त्यांना निषेधात्मक रस्ता चिन्हे देखील म्हटले जाते. निषेधात्मक रस्ते चिन्हे आकारात गोलाकार आहेत. गोलाकार आकारात काही अपवाद देखील आहेत, जसे की "विराम / थांबा" आणि "रस्ता द्या". त्यांचा घेर लाल आणि पार्श्वभूमी पांढरा आहे. चिन्हाच्या मध्यभागी काळ्या रंगाचे चिन्ह आहे जे लाल रेषा कापून जाते.
निषेधात्मक चिन्हांचे पालन न केल्यास घातक परिणाम उद्भवू शकतात तसेच जीवन आणि संपत्तीचे ही नुकसान होऊ शकते. अनिवार्य चिन्हांचे उल्लंघन करणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन मानले जाते आणि दोषींना दंडित केले जाऊ शकते
आम्ही या ठिकाणी प्रमुख निषेधात्मक रस्ता चिन्हांचे सचित्र वर्णन केले आहे.
विराम / थांबा
वाहनाला पूर्णपणे थांबवा. चारी दिशांना पहा आणि सुरक्षित वाटल्यानंतर आणि अनुमती मिळाल्यानंतरच पुढे जा. या चिन्हाच्या खालच्या बाजूला आणखी काही माहिती असू शकते. हे चिन्ह फक्त एकतर्फा, दुतर्फा किंवा सर्व दिशांनी जाणाऱ्या वाहनांसाठीही लागू होऊ शकते.
रस्ता द्या
हे चिन्ह प्रामुख्याने गोल चक्करच्या अगोदर किंवा एका मोठ्या रस्त्यावर प्रवेश करण्याच्या आधी पहायला मिळते. इथे काळजीपूर्वक पुढे जावे तसेच गोल चक्कर किंवा मोठ्या रस्त्यावर आधीपासून असणाऱ्या वाहनांना पुढे जाऊ द्यावे. तुमच्या उजव्या बाजूला असणाऱ्या वाहनांचा रस्त्यावर प्रथम अधिकार आहे.
प्रवेश निषिद्ध
इथे प्रवेश करू नये कारण या रस्त्यावर वाहनांच्या वाहतुकीची अनुमती नाही. जर तुम्हाला या दिशेने पुढे जायचे असेल तर दुसऱ्या एखाद्या मार्गाचा उपयोग करावा.
मागे वळण्यास मनाई आहे
येथून मागच्या दिशेने वळण्यास मनाई आहे. चौक किंवा रस्त्याच्या मध्यभागातून इथे वळण घेण्यासाठी पुरेशी जागा नाही तसेच यामुळे वाहतुकीमध्ये अडथळा येऊ शकतो.
डावीकडे वळण्यास मनाई
हे चिन्ह वाहन चालकाला निर्देशीत करते की कोणत्याही परिस्थितीत डाव्या बाजूला वळू नये.
उजवीकडे वळण्यास मनाई
हे चिन्ह वाहनचालकाला निर्देशीत करते की कोणत्याही परिस्थितीत उजव्या बाजूला वळू नये.
ओव्हरटेकिंग निषिद्ध
येथून पुढे जाणे निषिद्ध आहे. अरुंद रस्ता (ओव्हर टेकिंग) पूल किंवा वळण आदी ठिकाणी ओव्हरटेक करणे सुरक्षित नसते. अशा ठिकाणी या प्रकारचे चिन्ह लावून पुढे जाणे निषिद्ध बनवण्यात येते.
हॉर्न वाजवू नये
हा विभाग शांतता क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी हॉर्न वाजवू नये. हे चिन्ह प्रामुख्याने शाळा आणि रुग्णालयांच्या जवळपास पाहता येते.
वाहन थांबवण्यास मनाई आहे
रस्त्याच्या या भागावर वाहन उभे करण्यास मनाई आहे. येथे वाहन उभे करणे वाहतुकीच्या प्रवाहात अडथळा आणते तसेच अपघाताची शक्यताही निर्माण करत असते. उभ्या केलेल्या वाहनास पोलीस घेऊन जाऊ शकतात तसेच चालकाविरुद्ध दंडात्मक कारवाईही केली जाऊ शकते.
वाहन थांबवणे किंवा उभे करण्यास मनाई
रस्त्याच्या या भागावर वाहन थांबवणे किंवा उभे करण्यास मनाई आहे. वाहन थांबवणे किंवा उभे केल्यामुळे वाहतुकीच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो तसेच अपघाताची शक्यताही निर्माण करत असते. उभ्या केलेल्या वाहनास पोलीस घेऊन जाऊ शकतात तसेच चालकाविरुद्ध दंडात्मक कारवाईही केली जाऊ शकते.
वेगमर्यादा
हे चिन्ह वाहनाची वेगमर्यादा निश्चित करत असते. हे चिन्ह रस्त्यावर लावलेल्या वाहतूक चिन्हात दर्शविण्यात येते. या रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी वेग मर्यादेचे नेहमी पालन करणे आवश्यक आहे. परंतु अतिशय कमी वेगाने ही वाहन चालू नये त्यामुळे वाहतुकीचा प्रवाहात अडथळा येऊ शकतो.
वाहनाच्या लांबीची मर्यादा
चिन्हांमध्ये उल्लेखित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक लांबीची वाहने या रस्त्यावरून सुरक्षितपणे चालू शकत नाही. हे चिन्ह वळणदार रस्त्यावर किंवा वळणावर लावण्यात येते. या ठिकाणी लांब आकाराची वाहणे सुरक्षितपणे वळण घेऊ शकत नाहीत.
वाहनाची रुंदी मर्यादा
चिन्हांमध्ये उल्लेखित रुंदी पेक्षा अधिक रुंदीची वाहने या रस्त्यावरून सुरक्षितपणे चालू शकत नाहीत. हे चिन्ह अपूर्ण रस्ता किंवा पुलावर लावण्यात येते.
वाहनाच्या उंचीची मर्यादा
चिन्हांमध्ये उल्लेखित केलेला मर्यादेपेक्षा अधिक उंचीच्या वाहनांना येथून जाण्याची अनुमती नाही. पुढे कमी उंचीचा पूल, रेल्वे विजेची लाईन असू शकते आणि अधिक उंचीची वाहने तेथून जाऊ शकत नाहीत.
वाहन भार मर्यादा
चिन्हांमध्ये उल्लेखित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वजनांच्या वाहनांना येथून जाण्याची अनुमती नाही. पुढे कमजोर पूल किंवा रस्ता आहे, जो यापेक्षा अधिक वजन सहन करू शकत नाही.
धुरी भार मर्यादा
चिन्हांमध्ये उल्लेखित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वजनांच्या धुरी भार वाहनांना येथून जाण्याची अनुमती नाही. पुढे कमजोर पूल किंवा रस्ता आहे, जो यापेक्षा अधिक वजन सहन करू शकत नाही.
पादचारी निषिद्ध
या ठिकाणी पादचाऱ्यांना ये-जा करण्याची अनुमती नाही. त्यांच्यासाठी या ठिकाणावरून ये-जा करणे असुरक्षित ठरू शकते. हे चिन्ह प्रामुख्याने राज्यमार्ग तसेच व्यस्त चौकाच्या ठिकाणी पाहायला मिळते. येथे रस्ता ओलांडण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध असू शकतात.
मोटर वाहन निषिद्ध
येथे सर्व प्रकारची मोटार वाहने निषिद्ध आहेत. हे चिन्ह प्रामुख्याने बाजारासारख्या गर्दीच्या ठिकाणी पाहायला मिळते. येथे फक्त पादचार्यांना प्रवेश करण्याची अनुमती असते.
रहदारीचे मार्गदर्शन करणार्या अनिवार्य रस्त्यांच्या चिन्हे यांचे वर्णन येथे उपलब्ध आहे.